गावगाड्यातील बलुतेदार,अलुतेदार व भटक्या जमातीने इतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहिजे कल्याणराव दळे अध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ
जेजुरी वार्ताहर दि ८ देशात जाती निहाय जनगणना झाली पाहिजे,आणि त्यानुसार आरक्षण मिळाले पाहिजे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी आणि इतर भटक्या समाजाचे आरक्षण कमी झाले आहे याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. आरक्षणाचा लढा लढण्यासाठी गावगाड्यातील बलुतेदार,अलुतेदार,व भटक्या जमातींनी इतिहास घडविण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आवाहन राज्य बाराबलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
जेजुरी येथे मौर्य क्रांती महासंघाचे पहिले अधिवेशन व चौथी राज्यस्तरीय धनगर जमाती समूह जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कल्याणराव दळे बोलत होते. ते पुढे म्हणाले आरक्षणासाठी ओबीसी,धनगर समाज ,व इतर समाजाचे मोठे मोर्चे झाले ,मिळाले का आरक्षण ? वेगवेगळे लढून फायदा होणार नाही,त्याचा फायदा राजकारण्यांना होणार आहे. गावगाड्यातील सर्व जाती जमातींनी एकत्रित येवून संघटीत झाले पाहिजे.प्रत्येक जातीतील माणूस आपला वाटला पाहिजे .
यावेळी बोलतना ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे बोलताना म्हणाले की, राजकारणी नेते समाजात फुट पाडण्याचे महामाप करीत आहेत. वापरा आणि फेका अशा नीतीचा अवलंब केला जात असल्याने समाजाचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. कोणत्याही पक्षाची लाचारी न स्वीकारता राज्यातील सर्व पोटजातींनी एकत्र आले पाहिजे . समाजातील बुधीजीविनी तळागाळा पर्यंत जावून जनजागृती केली पाहिजे .
यावेळी बामसेफचे राष्टीय अध्यक्ष कमलकांत काळे,ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, मौर्य क्रांती महासंघाचे अध्यक्ष बलभीम माथेले , शिवाजी शेंडगे,लक्ष्मण व्हटकर, आदींची पहिल्या सत्रात भाषणे झाली . यावेळी राज्याच्या विविध भागातून धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.