अनोळखी मोबाईल नंबरपासून ग्राहकांची
लवकरच सुटका होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून महत्वाची सेवा
सुरू केली जाणार असून, मोबाईलवर
येणाऱया प्रत्येक फोन करणाऱयाचे नाव क्रीनवर दिसणार आहे.
सध्या ज्या व्यक्तीचा नंबर सेव्ह केला
आहे त्याचेच नाव मोबाईल क्रीनवर दिसते. अनोळखी नंबर अनेकदा जंक कॉल असतो. आर्थिक
फसवणुकीचे अनेक गुन्हे अशा नंबर्सवरून घडले आहेत. हे अनोळखी कॉल शोधण्यासाठी
युजर्सकडून ट्रूकॉलर (Truecaller) ऍपचा वापर
करतात. परंतु यातून खात्रीशीर माहिती मिळण्याची शक्यता कमीच असते. तसेच Truecallerकडून मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता
असते. यावर उपाय म्हणून 'ट्राय'ने केवायसी आधारे फिचर सुरू करण्याची योजना आखली आहे. कॉल
कोणाचा ही माहिती शंभर टक्के यातून मिळेल, असा 'ट्राय'चा दावा
आहे.
ज्याच्या
नावावर सीमकार्ड त्याचे नाव
'ट्राय'च्या या योजनेत केवायसी हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. केवायसी
फॉर्मवर सिमकार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल
केल्यावर दिसणार आहे. केवायसी सखोल तपासण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर असणार
आहे.