Type Here to Get Search Results !

शिंदे सरकार सर्वसामान्य जनतेला देणार आणखी एक झटका...

 


मुंबई: महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार आणखी एक झटका बसणार आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार असून, किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे.

त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्यामुळे सर्वसामान्या नागरिकांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.

राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास ४० हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वीजेची दरवाढ झाल्यास मोठा झटका बसणार आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies