पुण्यातील नवले रविवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील टँकरच्या धडकेने जवळपास 47 वाहनांचे नुकसान झाले.
मागील काही
दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. या परिसरात सतत होणारे अपघात
रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. राष्ट्रीय महामार्गाने ही यासंदर्भात
काही उपाययोजना करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. या परिसरात होणारे अपघात
रोखण्यासाठी नवले पूल आणि वडगाव पूल जोडण्यासंदर्भातला प्रस्ताव काही दिवसांपूर्वी
पुणे महापालिकेला देण्यात आला होता. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर
आता पुन्हा एकदा अपघात झाल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या
अपघातानंतर तरी प्रशासन नवले पुलावर काही तोडगा काढणार का हे पाहणे महत्त्वाचे
ठरणार आहे.
दरम्यान
रविवारी रात्री झालेल्या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. भरधाव वेगात टँकरने जवळपास
47 वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर येत
आहे. अपघातानंतर सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्या आणि हा भीषण अपघात झाला.
रात्री उशिरापर्यंत या अपघातात नेमके किती जखमी झाले याची माहिती समोर आली नव्हती.
अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य
राबवत जखमींना रुग्णालयात दाखल केले.