Type Here to Get Search Results !

'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को..., अब्दुलभाई अल्लाहाताला से तो डरिये'; सुषमा अंधारेंची फटकेबाजी

 


शिंदे गटातील आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सुरु असलेले एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. दोन्ही गटातील नेते टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.

अशातच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा कृषिमंत्री तथा शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यावर निशाना साधला आहे. 'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को', अशी काही परिस्थिती अब्दुल सत्तार यांची झाली असल्याचा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी सत्तारांना लगावला आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

रश्मीताई ठाकरे यांना मुख्यमंत्री करा म्हटल्याने आम्हाला मंत्रालयातील सहावा मजला पाहायला मिळाला नसल्याची टीका सत्तार यांनी केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना सुषमा अंधारे म्हणाले की, मला अब्दुल सत्तार यांच्या अभिनयाचं कौतुक वाटते. माझ्या हातात काही शक्ती असते तर सत्तार यांना मी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार दिला असता. एवढा खोटा बोलणार माणूस आहे. एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असा प्रवास करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा कोणत्याच पक्षाची ईमान नाही. त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात विश्रामगृहाची सोय नाही, रस्ते नीट नाहीत. सत्तार यांनी स्वतःच्या मतदारसंघात निव्वळ आणि निव्वळ ज्याला अत्यंत असभ्य व असंस्कृतपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी अशी विधान करायची. म्हणजे 'सौ चूहे खा के बिल्ली चली हज को', हे अब्दुल सत्तार यांना शोभा देत नसल्याचा अंधारे म्हणाल्यात.

अब्दुलभाई अल्लाहाताला से तो डरिये...

नाशिक येथील कृषी प्रदर्शनाला येणे निश्चित झाले असल्याने कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाता आले नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हंटले असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना सुषमा अंधारे म्हणाल्यात की, मी सिल्लोडमध्ये जाऊन बोलले असता भाजपच्या काही आमदारांनी मी अल्लाह-बिस्मिल्ला करत असल्याच्या टीका केल्या. पण ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत मी त्यांना उत्तर देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आमचे अब्दुल सत्तार हिंदुत्वासाठी गेले आहेत तर ते कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी का गेले नाहीत. जर ते कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जात नसतील तर ते इस्लाम धर्माच्या परंपरावर चालत आहे. पण तरीही ते कृषी प्रदर्शनामुळे कामाख्याला गेलो नसल्याचं म्हणत असतील तर, किमान 'अब्दुलभाई अल्लाहाताला से तो डरिये' असा टोला अंधारे यांनी लगावला.

News Reels

मुख्यमंत्र्यांवरही टीका

याचवेळी बोलतांना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाना साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक रात्रीच्या अंधारात पळून जाणारा असू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक दुसऱ्यांना हात दाखवून आपला भविष्य बघणारा नाही. तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारा, स्वतःचा कर्तृत्व आणि आपल्यासोबतच मराठी माणसाचा भवितव्य घडवण्याची हिम्मत ठेवतो असेही अंधारे म्हणाल्यात.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies