पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील क्रांती चौकात दोन गटात मोठी मारामारी झाल्याची घटना घडली आहे.
सीसीटीव्हीमध्ये
काही तरुण कोयत्याने वार करताना दिसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला
असल्याने, एकच पळापळ झाली. या घटनेनंतर पुन्हा
एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्राप्त
माहितीनुसार, कॉलेजमध्ये शिकणारे दोन विद्यार्थी या
वस्तीत रात्री आले होते.
यावेळी त्यांच्या गाडीचा समोरील
टोळक्याच्या गाडीला थोडक्यात टकराव होता होता राहिला.
यावेळी त्यांनी त्यांना जाब
विचारला असता,
या टोळक्यातील एकाने कोयत्याचा
धाक दाखवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्या दोन मुलांनी तेथून
पळ काढला. पण त्यांच्या मागे जात त्यांनी त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
याची कोणतीही फिर्याद अद्याप
पोलीस ठाण्यात दिली गेलेली नाही.
ही दोन मुले कॉलेज करणारी
असल्याने त्यांनी आपल्याला पोलीस 'तुम्ही इथे
का आलात', हा प्रश्न विचारतील या भितीने फिर्याद
दिली नाही, असे दिसते.
बुधवार
पेठेतील चार गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. तसेच लोकांची वर्दळ असते.
त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी
गुंडगिरी करण्याच्या प्रकारात काही टोळ्या अग्रेसर असतात.
त्यातूनच हा प्रकार घडला आहे. पण
या ठिकाणी फरासखाना आणि शुक्रवार पेठ पोलीस ठाणे असूनही पोलीस नव्हते,
त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण
आहे.