पुणे, दि. 20 -देशात सर्वत्र शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती कराताना एकसमान नियमावली असली पाहिजे, अशी मागणी युवाशाही संघटनेने केंद्र शासनाच्या दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे केली आहे.
सद्यस्थितीत
महाराष्ट्रामध्ये 2017 पासून
शिक्षकांची रिक्त पदे ही पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे भरण्यात येतात. त्याच
धर्तीवर ज्या प्रकारे प्रवित्र पोर्टल अंतर्गत गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण
किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा व अभियोग्यता व बुद्धिमत्ता
चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
देशात आणि
राज्यात विभाग कोणताही असो जिल्हा परिषद, संस्था, समाजकल्याण, अल्पसंख्याक, आदिवासी विकास विभाग तसेच इंग्रजी, उर्दू, मराठी, बंगाली सर्व माध्यम या मधील
शिक्षकांना व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेचे एक नियम करण्यात यावे. त्यानंतरच
गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना समान संधी निर्माण होतील व गुणवत्ता वाढीसही
प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन याबाबत लवकरच
सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी
युवाशाही संघटनेच्या विजय पाटील, अश्विनी कडू, तुषार देशमुख, चतुरसिंग सोळुंके, तुषार शेटे, प्रल्हाद भोसले, रामधन ठोंबरे यांनी केली आहे.