वाल्हे'त श्री भैरवनाथांच्या मुखवट्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून, प्राणप्रतिष्ठा उत्साहात.
वाल्हे (दि.२४) वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मुखवटा प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वाल्हे येथील कुंभारवाडा येथील देव घरातील श्री भैरवनाथाचा मुखवट्यांना श्री भैरवनाथ मंदिरात मुखवट्यांना दही, दूधाने
स्नान घालून सचिन देशपांडे व पुजारी सचिन आगलावे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करून विधिवत पूजा केली.
देवदिवाळीचे औचित्य साधून, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली. यावेळी, उजळून आणलेले देवाच्या मुखवट्याचे सजविलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
या नंतर मोठ्या भक्तीमय वातावारणा मध्ये मानकरी, सालकरी व गावकरी यांच्या उपस्थितीत सजविलेल्या बैलगाडी मधून मूर्तींची पारंपारिक वाद्यांच्या तालावर सवाद्य मिरवणुक काढुन 'नाथ साहेबाचं चांगभलं' च्या जयघोषात ढोल, ताशा, सनई च्या गजरामध्ये मुक्त गुलालाची उधळण करित फटाक्याची आतषबाजी करत "नाथ साहेबाच चांगभलेचा" गजरांमध्ये छबिण्याच्या तालावरती भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी, ठिक- ठिकाणी महिला बैलगाडीतून काढण्यात आलेल्या देवाच्या वाजत गाजत मुखवटा सोहळ्यातील बैलजोडीचे पाय धुवून, मनोभावे पूजन करीत स्वागत करीत होत्या. यावेळी, गावांतर्गत काढलेल्या वाजत- गाजत भव्य मुखवटा सोहळ्यास वाल्हे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यामधून उस्फूर्त सहभाग होता.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी नऊ वाजता सुरू केलेली मिरवणूक दुपारी एक वाजता कुंभारवाडा (देवघर)
येथे आल्यानंतर सालकरी, मानकरी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवाची आरती करण्यात आली. व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्थांसह महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.