राज्यातील मिंधे सरकारकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे.
शिवसेनेच्या नेत्यांविरोधात सरकारच्या
दबावाखाली एफआयआर दाखल केले जात आहेत. या दडपशाहीला शिवसेनेने मुंबई उच्च
न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेमुळे मिंधे सरकार गोत्यात येणार आहे.
याचिकेतील प्रमुख मुद्दे
विरोधी
पक्षांचा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर करून विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे, खासदार
अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव या शिवसेना नेत्यांविरुद्ध सीबीडी-बेलापूर
पोलीस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्दबातल करण्यात यावा.
फौजदारी
रिट याचिका निकाली निघेपर्यंत एफआयआरला स्थगिती देण्यात यावी. तसेच अर्जदार
शिवसेना नेत्यांविरुद्व आरोपपत्र दाखल न करण्याबाबत तपास यंत्रणेला सक्त निर्देश
द्यावेत.
शिवसेना
नेत्यांविरोधातील एफआयआर पूर्णपणे निरर्थक आहे. सरकारच्या दबावाखाली पोलीस
यंत्रणेने आपले मूळ कर्तव्य आणि जबाबदारीला हरताळ फासला आहे. केवळ विरोधकांचा आवाज
दडपण्यासाठीच एफआयआर नोंदवले गेले.
नेमके प्रकरण काय?
राज्यातील
सत्तासंघर्षादरम्यान शिंदे गटासोबत ठाणे, नवी
मुंबईतील जे शिवसेना नेते-पदाधिकारी गेले नाहीत त्यांना नाहक त्रास देण्यासाठी
तडीपारीच्या नोटिसा काढण्यात आल्या, त्यांच्याविरुद्ध
खोटे गुन्हे दाखल केले गेले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने गेल्या
महिन्यात 19 ऑक्टोबरला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर
शांततेच्या मार्गाने धडक मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या प्रमुख
नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान
देण्यात आले आहे.