मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज
आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात मोठे विमान उतरले.
दरम्यान, एअरबस कंपनीचे 'ए300-600 एसटी' हे 'बेलुगा' नावे ओळखले जाणारे विमान 51 टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व
विमानाचा मुख्य भाग त्याच्या वर आहे. खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा
आहे. अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. नागरी उपयोगातील अॅन्तोनोव्ह कंपनीचे 'एएन 124' व 'एएन 225', ही दोन
विमाने सर्वाधिक मोठी होती. या दोघांची सामान वाहून नेण्याची क्षमता ही 171 व 250 टन आहे. या
तोडीचे अन्य कुठलेही विमान आतापर्यंत अस्तित्वात नव्हते. 'एएन 225' विमानाने
दिल्ली मेट्रोसाठीचे डबे आणले गेले होते.
40 हजार 700 किलो वजन
वाहून नेण्याची क्षमता
एअरबस बेलुगा या विमानाला
अधिकृतपणे Airbus
A300-608ST (सुपर
ट्रान्सपोर्टर) असे म्हणतात. याला बेलुगा म्हणतात कारण त्याची रचना बेलुगा व्हेल
माश्यासारखी आहे. या बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे
विमान आहे. बेलुगा एअरबसचे पहिले उड्डाण 13 सप्टेंबर 1994 रोजी झाले होते. एअरबसने 1992 ते 1999 दरम्यान
अशी केवळ पाच विमाने बनवली आहेत. एवढे मोठे विमान फक्त दोन पायलट उडवतात. हे
विमानामध्ये 40
हजार 700 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. हे विमान 184.3 फूट लांब आणि 56.7 फूट उंच आहे. जेव्हा ते पूर्णपणे रिकामे असते तेव्हा त्याचे
वजन 86,500 किलो असते.
Reels
प्रति तास 864 किलोमीटरचा
वेग
बेलुगा एअरबसचा वेग प्रचंड आहे.
या विमानाचा कमाल वेग 864 किलोमीटर
प्रति तास आहे. ते एकावेळी जास्तीत जास्त 27 हजार 779 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. कमाल 35 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.