मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. यानिमित्त प्रत्येक शिवसैनिक शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी जमा होणार आहेत. नुकतीच शिवसेनेत फूट पडलेली असताना या कार्यक्रमादरम्यान वाद निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच दर्शन घेणार आहेत.
बाळासाहेबांचे
आशीर्वाद घ्यायचे असतील तर हातातील खंजीर बाजूला ठेऊन जा असं संजय राऊत म्हणालेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दिनानिमित्त एकनाथ शिंदे आजच स्मृती स्थळावर हजेरी
लावणार असल्यामुळे उद्या शिवसैनिक आणि त्यांच्यात होणारा संघर्ष टळणार आहे. याबाबत
राऊत यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.
“बाळासाहेब
ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि
मग स्मारकाला हात जोडायला जा. कोणीही असो मी कोणाचे नाव घेत नाहीए पण खंजीर बाजूला
ठेवा आणि मग आशीर्वादासाठी जा” असं संजय
राऊत यावेळी म्हणाले. सध्या काय सुरु आहे काय होतंय बाळासाहेब ठाकरे सर्व पाहत
आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत खंजीर खुपसणाऱ्यांचं भलं झालेलं नाही हा
इतिहास आहे असही राऊत यावेळी म्हणाले.