पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाला आहे.
पंतप्रधान
मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या
आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे
शाखा यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या
व्यवस्थापकाची चौकशी केली असता समुप्रभात बेज नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी
त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती
पोलिसांना मिळाली.