Type Here to Get Search Results !

सैन्यात भरती व्हायचे स्वप्न राहिले अधुरे ! व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या


 रंगाबाद : औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या एका तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ओमकार नारायण डांगरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी हा तरुण घरी न सांगता सकाळपासून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे या तरुणाच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा घरी न आल्याची तक्रार दाखल केली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तांत्रिक विश्लेषण करत ओमकारचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. त्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत आढळले.

यानंतर पोलिसांनी या मोबाईल लोकेशनच्या आधारे औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक 18 मध्ये धाव घेतली. त्यावेळी एका विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर ओमकारचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. ओमकार डांगरे याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर "I just feel like if I died everything will be ok:" अशा प्रकारे स्टेटस ठेवत आपल्या आयुष्याचा शेवट केला. मात्र ओमकारने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहे.

:

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies