Type Here to Get Search Results !

कुणी डॉक्टर, वकील तर कुणी परिचारिका, 'या' महिलांनी गाजवलं मुंबईचं महापौरपद

 


देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईला ओळखले जाते. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. दरम्यान, आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे.

या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. त्यामुळे मुंबई मनपात सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमत विशेष लेख मालिका सुरुवात केली आहे. मुंबईचे महापौरपद हे देशातील एक प्रतिष्ठित पदांपैकी एक मानलं जातं.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याठिकाणी असते. आतापर्यंत सात महिलांनी मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मग या महिला कोण आणि त्यांनी कसा कारभार केला, ते जाणून घेऊयात. सुलोचना मोदी - पहिल्या महिला महापौर सुलोचना मोदी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य.

त्या मुंबईच्या महिला महापौर होत्या. 1956 मध्ये त्यांनी महापौरपदाची जबाबदारी स्विकारली होती. पण त्या या मुंबईच्या महापौर पदावर एक महिनाच होत्या. निर्मला सामंत-प्रभावळकर - यानंतर काँग्रेसच्या निर्मला सामंत-प्रभावळकर या 1994 मध्ये मुंबईच्या महापौर झाल्या.

झोपडपट्टीत फिरणाऱ्या महापौर, अशी त्यांची ओळख होती. त्या पेशानं वकील होत्या. तसेच त्यांची प्रतिमा ही बुद्धिवादी होती. त्यांना नागरी समस्यांचा चांगला अभ्यास होता.

सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या काम करायच्या, असं त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. तसेच महिलांचे प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडले. विशाखा राऊत - यानंतर विशाखा राऊत यांची 1997 मध्ये मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्या शिवसेनेच्या पहिला महिला महापौर होत्या.

विशाखा राऊत यांचा महापालिका कायद्याचा चांगला अभ्यास होता. त्या निष्पक्षपणे सभागृह चालवायच्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत सकस आणि अभ्यासपूर्ण चर्चा सभागृहात व्हायच्या. त्यांची प्रतिमा डॅशिंग होती.

शुभा राऊळ - शुभा राऊळ पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबईचे महापौर सांभाळले. त्यांनी तंबाखुमुक्त मुंबई आणि हुक्का पार्लर बंद करण्याची मोहीम उघडली होती. यासाठी त्या तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही भेटल्या होत्या.

त्यांच्या या धडक मोहिमेचे कौतुक स्वत: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते. तसेच समुद्रामध्ये गणपती विसर्जन करू नये आणि गणेश मूर्ती या 18 फुटांपेक्षा कमी उंचीच्या असाव्यात, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेला त्यांच्या शिवसेना या पक्षाकडून विरोध झाला. त्यामुळे त्यांना हे दोन्ही निर्णय अंमलात आणता आले नाहीत.

तर गणेश विसर्जनासाठी पहिल्यांदा महापौर बंगल्यात कृत्रिम तलाव शुभा राऊळ यांच्याच पुढाकारानं उभारण्यात आले. श्रद्धा जाधव - यानंतर 2009 मध्ये श्रद्धा जाधव यांची शिवसेनेच्या महापौरपदी निवड झाली. श्रद्धा जाधव यांनी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना आरक्षित भूखंडांमुळे वादग्रस्त ठरवण्यात आले.

आरक्षित भूखंड पालिकेने का खरेदी करावेत? असा प्रश्न त्या उपस्थित करत आणि प्रस्ताव नाकारत. मात्र, नंतर त्यांना विरोधी पक्ष आणि त्यांच्याच पक्षातील काही नगरसेवकांच्या दबावामुळे भूमिका बदलावी लागली आणि यानंतर त्यांनी अखेर आरक्षित भूखंड खरेदी नोटीस मंजूर केली. त्या कालावधीमध्ये हा विषय वादग्रस्त ठरला होता.

हेही स्नेहल आंबेकर - यानंतर स्नेहल आंबेकर या मुंबईच्या महापौर झाल्या. आंबेकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रियतमा सावंत यांचा 57 मतांनी पराभव करीत महापौरपद पटकावले होते. लोअर परेलमधून 2012 साली प्रथमच नगरसेविका झालेल्या आंबेकर यांना थेट महापौरपदाची संधी मिळाली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ हा त्यांच्या विधानांमुळेच चांगला गाजला होता.

त्यांच्यावर निधी वाटपातल्या अनियमिततेचाही आरोप झाला होता. तसेच स्वाईन फ्लू झाडांमुळे पसरतो, याप्रकारची धक्कादायक विधानं त्यांनी केली होती. यानंतर त्या विधानसभेच्या आमदारही झाल्या होत्या. किशोरी पेडणेकर - यानंतर 2019 मध्ये किशोरी पेडणेकर यांची मुंबई मनपाच्या महापौरपदी बिनविरोधन निवड करण्यात आली होती.

2002
रोजी पहिल्यांदा त्या निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडणून आल्या. त्यांनी बालकल्याण आणि स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी काम केलं आहे. त्यानंतर पुन्हा 2012 आणि 2017 रोजी किशोरी पेडणेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली होती. स्थायी समितीच्या बैठकांमध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू कायम उचलून धरली. आक्रमक आणि निष्ठावान नगरसेवक म्हणून महापालिकेत त्यांची एक वेगळी ओळख आहे. परिचारिका ते महापौर असा थक्क करणारा प्रवास त्यांचा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies