Pune PMPML : पीएमपीएल बस चालक (PMPML) आणि दुचाकी चालकामध्ये (Pune) तुंबळ हाणामारी झाली आहे.
या
मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी
चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर वाहकाने हा
प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला
सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली.
त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
हाणारामारीमुळे काही वेळ वाहतूक कोंडी
पुण्यातील पुणे स्टेशनच्या
परिसरात कायम मोठी रहदारी असते. याच रस्त्यावर पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी
चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अनेक लोक
हाणामारीमुळे खोळंबले होते. घडल्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
चालकांच्या हल्ल्यामध्ये वाढ
पुण्यात पीएमपीएमएलच्या चालक
किंवा वाहकांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी
पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाने चक्क पीएमपीएमएलच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचा
प्रकार समोर आला होता. बसला एक दुचाकी आडवी येत होती ती काढायला लावली या
कारणावरुन त्याने शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली होती. पिंपरी चिंचवडमधील
नेहरुनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला होता.
पीएमपीएमएल बसचं संचलन सुरु होतं. यावेळी रस्त्यात संतोषी माता चौकात एक दुचाकी
आडवी येत होती. त्यावेळी चालकाने तरुणाला गाडी बाजूला करण्यासाठी सांगितलं होतं.
मात्र याचा तरुणाला राग आला आणि तुला माहित आहे का, मी कोण आहे? असं
म्हटलं. यावरुन दोघांंमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलाने थेट बसमध्ये
प्रवेश केला आणि चालकाला मारहाण केली होती. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचं नाव
होतं.
Reels
पीएमपी प्रशासनाकडून गंभीर दखल
सतत होत असलेल्या घटनांमुळे
प्रशासनाची या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वाहन चालक किंवा मालक यांची
काही तक्रार असेल तर त्यांच्याशी वादावादी करु नका. 020-24545454 यानंबरवर त्यांनी तक्रार नोंदवा, असं आवाहन प्रशासनाने पुणेकरांना केलं आहे.