अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फेसबुक शॉर्ट विडिओ आणि रिल्स ने तर सोशल मीडियाचे जग व्यापून टाकले आहे.
नाशिकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये मुलींची फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. आज सकाळपासून फेसबुक, व्हाटसप वर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून छोट्या गोष्टींवरून
झालेले हे भांडणं विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात
असलेल्या एका कॉलेजमध्ये हा तुफान राडा झाला आहे. यात भांडण सोडवायला गेलेल्या
तरुणीची त्रेधातिरपीट उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर व्हिडीओत दिसणाऱ्या दुसऱ्या
दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सकाळची वेळ असल्याने
कॉलेजचा हजारो विद्यार्थ्यांचा गराडा या तरुणींचे भांडण पाहत व्हिडीओ काढत
असल्याचे दिसते आहे.
कॉलेजमधील
सकाळची वेळ. दोन तरुणी कँटीन समोरील पटांगणात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरु होती. अशातच
कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या कॅंटीनमध्ये अचानक गोंधळ सुरु झाला. दोन मुलींमध्ये
बसण्यावरून वाद झाला. यावेळी कँटीन चालकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर या
मुली भांडत भांडत बाहेर पडल्या. यावेळी क्षुल्लक कारणाचे रूपांतर हाणामारीत होत.
व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की, दोन तरुणी
चालत चालत एकमेकींच्या जवळ येतात. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार भांडण सुरु होतं.
दोघी एकमेकिंना अशा भिडतात की एकमेकींच्या झिंज्याच उपटतात. यातील एक तरुणी
दुसऱ्या तरुणीला केसांना अंधारून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दोघीही
एकमेकींना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल
मीडियावर जोरदार शेअर होत आहे.
विशेष
म्हणजे भांडण सुरु झाल्यांनतर आजूबाजूला विद्यार्थ्यांची तुफान गर्दी होते. मात्र
हि गर्दी भाडंण सोडविण्याआधी ते व्हिडीओ काढत बसतात. यातील एक मुलगी भांडण
सोडविण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र काही काळ दुसऱ्या दोघी मात्र भांडणात
एवढ्या गुंग झालेल्या आहेत कि, आपला
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याच भानही
राहत नाही. सध्या हाणामारीचा घटनेचा व्हिडीओ नाशिक शहरात जोरदार व्हायरल झाला असून
या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.