चंद्रपूर : एकीकडे श्रद्धा हत्याकांड प्रकरण गाजतंय. अशातच दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील एका पतीच्या खळबळजनक हत्याकांडाचं तब्बल तीन महिन्यांनी गूढ उकललं गेलंय.
3 महिन्यांपूर्वीच्या
कॉल रेकॉर्डिंगने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील हत्याकांडाचं गूढ
उकललंय. अनैतिक संबंधात अडसर ठरत असणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने
हत्या केली. या हत्याप्रकरणी आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आलीय.
6 ऑगस्ट 2022 रोजी ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम
रामटेके यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी रंजना यांनी आपल्या दोन्ही मुलींना वडील
हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले असा निरोप दिला.
आईने
सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली परत आल्या. रीतसर
अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे
राहण्यास आली. मात्र तिला आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले.
रंजना रामटेके
यांचे आंबेडकर चौकात छोटे जनरल दुकान आहे. या दुकानालगतच मुकेश त्रिवेदी यांचे
भाजीपाला व बांगडी विक्रीचे दुकान आहे. मुकेश त्रिवेदी यांचे वारंवार घरी येणे
मुलींना खटकू लागल्यावर दोघींनी आई व मुकेश त्रिवेदी दोघांनाही समाजात बदनाम
होण्याबाबत समज दिली होती.
आई एकटीच
राहत असल्याच्या काळात मुलीने तिला आपला स्मार्टफोन देऊ केला होता. मात्र
वडिलांच्या निधनानंतर तिने हा मोबाईल परत स्वतःकडे घेतला. त्यावेळेस तिला 6 ऑगस्ट रोजी पहाटेचे हे दहा मिनिटांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले.
हे कॉल
रेकॉर्डिंग एकून मुलगी हादरलीच. मुकेश त्रिवेदी या प्रियकराच्या मदतीने कट रचून
आधी आईन जेवणात वडिलांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानं बेशुद्ध अवस्थेत
आईनेच तिच्या प्रियकराच्या साथीने वडिलांची हत्या केली, असा आरोप मुलीने कालय.
वडिलांचे
हातपाय बांधून आईने त्यांच्या तोंडावर उशी दाबली आणि वडिलांचा खून केला, असा आरोप करण्यात आलाय. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून
पोलिसांनी रंजना रामटेके व मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
त्यात धक्कादायक खुलासा झालाय.