कऱ्हाड - मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कºहाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.
राजवर्धन महादेव पाटील (वय २४, रा. जुळेवाडी) असे
खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हल्लेखोर पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील एका
युवकाचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रात्री केक कापण्याचा कार्यक्रम
घेण्यात आला होता. गावातील चौकातच त्यासाठी युवक जमले होते. राजवर्धन हासुद्धा
त्याठिकाणी गेला. राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या चौकातच हा
कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू असताना गावातीलच एका युवकाने राजवर्धन याच्यावर
धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केले.
अचानक घडलेल्या या घटनेने युवकांची
धावपळ उडाली. वार केल्यानंतर राजवर्धनला रक्तबंबाळ स्थितीत सोडून आरोपी तेथून पसार
झाला. तर राजवर्धन त्याही परिस्थितीत चालत घरापर्यंत गेला. कुटूंबिय व
ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. खुनाचे कारण अद्याप
स्पष्ट झालेले नाही. तसेच हल्लेखोर युवकाचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने गावात
तणावाचे वातावरण असून पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.