पुणे - गोलाकार फिरणारे तेलाचे दिवे, रंगीबेरंगी फुलांची आकर्षक रंगावली आणि हजारो पणत्यांच्या प्रकाशात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर उजळून निघाला.
बुधवार
पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देवदिवाळीनिमित्त
तेलाच्या १२ हजार ५०० सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली.
तसेच
आकर्षक पुष्परचना साकारुन पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. दरम्यान , यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, रजनी
उकरंडे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी
प्रताप परदेशी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे
यंदाही देवदिवाळीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे प्रवेशद्वार
व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले.
तसेच
कळसावर संपूर्णपणे रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. कळसावर ओम, श्री व स्वस्तिक च्या शुभचिन्हांची सजावट देखील पणत्यांच्या
माध्यमातून करण्यात आली.
मंदिरात
अनेक प्रकारच्या समई व दिवे पाहण्यासोबतच दत्तमंदिरातील दीपोत्सवाचे मोबाईलमध्ये
दृश्य कैद करण्याकरीता व मार्गशीर्ष गुरुवार मुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.