बारामती - दरवर्षी जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जाहीर केली जाते. त्यांनी घेतलेल्या सर्वेक्षणात विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , बारामती, पदार्थविज्ञान विषयाचे डॉ. रमेश देवकाते यांना यावर्षीच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले आहे.
डॉ. रमेश
देवकाते यांनी पदार्थविज्ञान या विषयामध्ये प्रा. के. वाय. राजपुरे व प्रा. सी .
डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच. डी. मिळवली आहे. विद्या प्रतिष्ठानचे
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ते
सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांना संशोधनातील १५वर्षांचा अनुभव
आहे. त्यांनी सौर ऊर्जा , सुपरकॅपॅसिटर, बॅटरी, व वॉटर
स्प्लिटींग इत्यादी बाबींवर संशोधन आहे.आजवर संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या
भरीव कामगिरीच्या आधारे त्यांना २०१९ साली भारत सरकारच्या भास्करा अडवान्सड सोलर
एनर्जी (BASE)
फेलोशीप प्रोग्रॅम यामध्ये
त्यांची निवड झाली होती, विशेष
म्हणजे यासाठी पूर्ण देशातून फक्त ६ जणांची निवड करण्यात आली होती त्यापैकी ते एक
आहेत. या फेलोशीप अंतर्गत त्यांनी मिसूरी युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेकनॉलॉजि, रोला, अमेरिका
येथे पोस्टडॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी भारत सरकारकडून आणि विद्यापीठ स्तरावरून
आजवर संशोधन प्रकल्पासाठी यांच्या ४३ लाख रुपयांचा निधी आणला आहे. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थी पीएचडीचे संशोधन करीत आहेत.
यावर्षी
सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च इंजिनीरिंग बोर्ड (SERB) यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या टीचर्स असोसिएटशिप फॉर रिसर्च
एक्सलन्स (TARE)
या फेलोशीपसाठीही त्यांची निवड
झाली आहे. या अंतर्गत इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISC), बंगलोर या ठिकाणी बॅटरी साठी लागणाऱ्या
पदार्थावर ते ३ वर्षे संशोधन करणार आहेत. डॉ. देवकाते यांनी संशोधन क्षेत्रात
मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत शिंदे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उप प्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. श्यामराव घाडगे , सर्व
विषयाचे विभागप्रमुख , प्राध्यापक
सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.