Type Here to Get Search Results !

हॉटेल रॅडिसन ब्लू चे मालक अमित जैन यांची आत्महत्या

 


हॉटेल रॅडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांनी दिल्ली येथे आत्महत्या केली आहे. त्याच्यावर बँकांचे मोठे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित जैन यांनी दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील त्यांच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी 1 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

अमित जैन हे शनिवारी सकाळी त्यांच्या नोएडा येथील नवीन घरातून नाश्ता करून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील त्यांच्या घरी आले होते. शुक्रवारी एक दिवस आधी संपूर्ण कुटुंब नोएडामध्ये थांबले होते. सकाळी त्यांचा भाऊ करण याला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडल्यानंतर ते एकटेच कारमधून घराकडे गेले.

शनिवारी अमित जैन यांचा मुलगा आदित्य हा ड्रायव्हरसोबत कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला जैन हे लटकलेल्या अवस्थेत दिसले. यावेळी कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चौकशी सुरू असून सीआरपीसी कलम 174 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies