मध्य प्रदेशात बस आणि कारचा भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू
बैतुल :
मध्य प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बेतुलमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला.
बैतुल :
मध्य प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बेतुलमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बैतुल येथे आज पहाटे भीषण अपघात झाला. बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस स्टेशन परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर या अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैतूलचे एसपी सिमला प्रसाद यांनी या अपघाताची माहिती दिली आहे