Type Here to Get Search Results !

मोठ्या स्पर्धकांना टक्कर देत गुंजन सिन्हाने मारली बाजी, 'झलक दिखला जा १०'ची ठरली विजेती


 'झलक दिखला जा'च्या १०व्या पर्वाची विजेती गुंजन सिन्हा (Gunjan Sinha) ठरली आहे.

'झलक दिखला जा १०'(Jhalak Dikhhla Jaa 10) या लोकप्रिय डान्स शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

'झलक दिखला जा'च्या १०व्या पर्वाची विजेती गुंजन सिन्हा (Gunjan Sinha) ठरली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गुंजन शोमधील सगळ्या स्पर्धकांपेक्षा वयाने लहान आहे.

गुंजनसह रुबिना दिलैक, गश्मीर महाजनी, फैसल शेख, निशांत भट्ट आणि सृती झा हे स्पर्धक अंतिम टप्प्यात पोहोचले होते. पण या सर्व स्पर्धकांना मागे सारत गुंजनने विजेतेपदाचा मान पटकावला. अवघ्या आठ वर्षांच्या गुंजनने 'झलक दिखला जा'चं दहावं पर्व चांगलचं गाजवलं. गुंजनला ट्रॉफीसह २० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे.

गुंजनच या पर्वाची विजेती होणार याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी आधीच लावला होता. सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे 'झलक दिखला जा १०'चे चाहते मात्र नाराज झाले. गुंजन एक चांगली डान्सर आहे म्हणूनच तिने हा शो जिंकला. मग आमच्या मतदान करण्याला काय अर्थ आहे. त्यांनी पुन्हा शोमधून मतदान ठेवू नये, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies