Type Here to Get Search Results !

भारत-न्यूझीलंड सामना चाहत्यांना टीव्हीवर पाहता येणार नाही ? पाहा काय आहे कारण

 


मुंबई : उद्यापासूनटीम इंडिया  आणि न्यूझिलंड यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे.

टीम इंडिया पहिल्यांदा हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात युवा खेळाडूंसह न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारत-न्यूझीलंड या दोन अशा टीम आहेत, ज्या विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनमध्ये पराभूत झाल्या आहेत.

उद्यापासून सुरु होणाऱ्या मालिकेकडे टीम इंडियाच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर मोठा बदल होणार असल्याचे सुचक वक्तव्य केले होते. पहिल्या सामन्यात हवामान खात्याने मैदान परिसरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

या कारणामुळे भारत-न्यूझीलंड सामना तुम्हाला टीव्हीला पाहता येणार नाही

भारत-न्यूझीलंडची मॅच तुम्हाला टीव्हीला पाहता येणार नाही. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. या मॅचेचं थेट प्रसारण अॅमेजॉन प्राईम अॅप आणि वेबसाइटवरती करण्यात येणार आहे. सोनी टिव्ही आणि स्टार स्पोर्ट्स या वाहिन्यांकडे प्रसारण करण्याचे अधिकार नाहीत. विशेष म्हणजे डीडी स्पोर्ट्स यांचं प्रसारण करु शकते. कारण अधिकतर टीम इंडियाच्या मॅच डीडी स्पोर्ट्सवर दाखवल्या जातात.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक सिंह, चहल. कुलदीप सेन, उमरान मलिक

टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies