बुलडाणा 13 नोव्हेंबर : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वाढदिवसाच्या दिवशीच एका इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला आहे. वाढदिवस असल्याने मित्राने फोन करुन या तरुणाला बाहेर बोलावलं होतं.
या फोननंतर हा तरुण घराबाहेर
पडला, मात्र तो परतलाच नाही. वाढदिवस असल्याने मित्राच्या फोननंतर बाहेर
गेलेल्या इंजिनिअर मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यावर मृतक
मुलाच्या पित्याने मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. माझ्या मुलाचा खून झाला आहे, असं म्हणत त्यांनी खामगाव
पोलिसांत तक्रार दिली आहेतब्बल 24 वर्षांनी उलगडलं एका खुनाचं गूढ...पोलिसांनी हुशारीने शोधून काढला खुनीगौरव जाधव या इंजिनिअर मुलाचा वाढदिवस होता.
त्यावेळी त्याला मित्राचा फोन
आला आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं सांगून गौरव घराबाहेर पडला. मात्र, तो परतलाच नाही. नंतर त्याचा
अपघात झाला असं सांगण्यात आलं. मात्र हा अपघात नसल्याचं गौरवच्या वडिलांचं म्हणणं
आहे.
तो अपघात नसून घातपात असल्याचा
संशय गौरवच्या वडिलांना आहे. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.आईने स्वतःच्या
प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटनापुण्यातील महिलेचं धक्कादायक कृत्य - नुकतंच पुण्यातून एक भयानक घटना
समोर आली होती.
यात एका आईने आपल्या
प्रियकरासोबतच पोटच्या मुलीचं लग्न लावून दिलं. हे कुटुंब चंदननगर भागात राहात
आहे. पीडित मुलीच्या आईचे संबंध एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. तिने आपल्या
मुलीला हेच तुझे वडील आहेत असंही सांगितलं होतं. मात्र काही दिवसांनंतर आईनेच
मुलीला त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं. तू त्याच्याशी लग्न केलं
नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी तिने मुलीला दिली. इतकंच नाही तर महिलेनं पोटच्या मुलीला या
व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही भाग पाडलं.