मंचर: राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी अतिक्रमणे काढण्याबत व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांना प्रतिसाद देत मंचर शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय
राजमार्ग प्राधिकरणाच्या आतिक्रमन विरोधी कारवाईच्या नोटीसा मिळताच मंचर परिसरातील
पुणे-नाशिक महामार्गालागत व्यवसाय करणारे काही व्यापारी व व्यवसायिक एकत्र आले व
त्यांनी स्वतःहून ही अतिक्रमणे काढण्याबाबत भूमिका घेत इतरांनाही अतिक्रमणे
काढण्याची विनंती केली.
त्यात
बाळासाहेब नाना थोरात, महेश मोरे, मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले, उद्योजक सतीश बेंडे, हॉटेल
व्यावसायिक सचिन तोडकर, निलेश वळसे
पाटील, सागर बेंडे, बबू बेंडे, भरत कानडे
आदींनी पुढाकार घेत संपूर्ण मंचर परिसरात फिरून अतिक्रमणे काढण्याबाबत
व्यावसायिकांना अवाहन केले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नोटीसा व मंचर
परिसरातील व्यावसायिकांचे अतिक्रमणे काढण्याबाबतच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
50 फुटांपर्यंतची
अतिक्रमणे काढणार
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने
पुणे-नाशिक महामार्गालगत अतिक्रमणविरोधी नोटीसा बजावताना काही ठिकाणी रस्त्याच्या
माध्यपासून 40
फुटावर तर काही ठिकाणी 50 फुटावर तर काही ठिकाणी रस्त्याच्या माध्यपासून 75 फुटांवर अतिक्रमणे काढण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र यावर मंचरमधील सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत सर्रास 50 फुटांपर्यंतची अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला.