मुंबईतील गोरेगावच्या दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
आगीत झाडं जळून खाक
जंगलाला
लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडं जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण
होती की, लांबूनही स्पष्टपणे दिसत होती.
अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. अखेर दोन
तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.
दरम्यान, ज्या जंगल परिसरात आग लागली आहे, तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग असल्याची माहिती
मिळाली आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण असे
अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरात अनेक वनस्पती देखील आहेत.
पण या आगीच्या घटनेमुळे या वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.