Type Here to Get Search Results !

'वास्तव' फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड; मराठीसह हिंदी चित्रपटात कमावलं नाव

 


मुंबई, 14 नोव्हेंबर: सिनेसृष्टीतून दररोज वाईट बातम्या समोर येत आहेत. कालच मराठी मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली. लोकप्रिय मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाची मृत्यू झाला.

तिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असताना आज अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते.

रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांच्या अंत्ययात्रेला दुपारी १ वाजता सुरुवात होणार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जातील. हेही मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती.

सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले. मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठीशिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

निवडुंग (१९८९), मधुचंद्राची रात्र (१९८९), जसा बाप तशी पोर (१९९१), ईश्वर (१९८९), नरसिम्हा (१९९१) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान गेल्या काही काळापासून मात्र ते सिनेइंडस्ट्रीपासून दूर होते. अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies