अतिक्रमण काढण्याबाबत सरकारने न्यायालयाकडे पुनर्विचार याचिका सादर करावी: आ.संजय जगताप यांची मागणी
सरसकट अतिक्रमण काढल्याने लाखो लोक बेघर होतील
सासवड दि. २८
न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या सर्व ग्रामपंचायत यांनी गायरान जागेतील अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे गायरान जागेत राहणारे गोरगरीब जनता भयभीत झाली असून या कारवाईमुळे गरजू आणि गरीब लोकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. राज्य सरकारने याबाबत विचार करून कोर्टाकडे पुनर्विचार याचिका सादर करून यासाठी वेळ मागून घ्यावा.अशी मागणी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे.
ज्यांची राहण्याची घरे आहेत किंवा ज्यांना शासकीय योजनेमधून गायरान जागेत घरी बांधण्यात बांधून दिले आहेत ती सोडून बाकी धनदांडग्यांनी केलेले गायरान जागेतील अतिक्रमण काढून टाकले जावे. असं पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी म्हटले. आज सोमवारी सासवड येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.याबाबत लवकरच तोडगा काढू अस त्यांनी म्हंटले आहे. या कारवाईमुळे दोन लाख घरे पडतील ती वाचली पाहिजेत असं त्यांनी म्हटले आहे.