पौड - मुळशी तालुक्यातील ऑनलाइन 7/12 मधील नावामध्ये, क्षेत्रात, इतर हक्कातील नोंदी, भोगवटादार वर्ग प्रकारामध्ये अनेक तफावती दिसून येत आहेत. या किरकोळ अशा टायपिंग स्वरूपातील चुका मोठ्या प्रमाणात असून याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मुळशीतील प्रत्येक गावात शासनाच्या वतीने 7/12 चूकदुरुस्ती करिता महाराजस्व अभियान राबवावे याकरिता निवेदन देण्यात आले होते.
मंडलनिहाय आयोजन :
दि. 1 डिसेंबर- घोटावडे मंडल,
दि. 2 डिसेंबर- पिरंगुट मंडल,
दि. 5 डिसेंबर- थेरगाव मंडल,
दि. 6 व 7 डिसेंबर
पौड, माले, मुठा मंडल मधील येणारी तलाठी कार्यालय मधील गावांची चूक दुरुस्ती
करिता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.