आज केंद्र सरकारतर्फे दुसऱ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
युवकांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची
पूर्तता करण्यासाठी रोजगार मेळा हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. पीएमओने सांगितले
की रोजगार मेळा युवकांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासाच्या सहभागासाठी
एक संधी देण्यात येत आहे. पंतप्रधानांनी ऑक्टोबर महिन्यात रोजगार मेळावा सुरू केला
होता. तेव्हा पहिल्या टप्प्यात 75 हजार
तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
45 ठिकाणी
नियुक्तीपत्रे देण्यात येणार
या
कार्यक्रमाबाबत पीएमओने माहिती दिली की, ज्या
लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत ते देशभरातील आहेत. देशात 45 विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात तरुणांना नियुक्तीपत्रे दिली
जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये
हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, असेही
पीएमओने सांगितले. शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, नर्सिंग
अधिकारी, डॉक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर
आणि इतर तांत्रिक आणि पॅरा मेडिकल पदांवरही नियुक्ती केली जाणार आहे. पीएमओने
सांगितले की, यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून
विविध केंद्रीय दलांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'कर्मयोगी
प्रबंध' या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन
पंतप्रधान यावेळी नवनियुक्त
कर्मचार्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या 'कर्मयोगी
प्रबंध' या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटनही
करतील. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणची नीतिमत्ता, मानव
संसाधन धोरणे,
भत्ते आणि इतर फायदे यांच्याशी
संबंधित माहितीचा समावेश असेल, ज्यामुळे
तरुणांना सरकारी धोरणांशी तसेच नव्या भूमिकेशी सहजपणे जुळवून घेण्यास मदत होईल.
यावेळी नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर इतर
अभ्यासक्रम शोधण्याची संधीही मिळेल. त्यासाठी एक वेब पोर्टल विकसित करण्यात आले
आहे. दरम्यान,
पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये आणि
विभागांना विविध पदांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचे निर्देश दिले होते.