Nagpur Crime : 24 तासात तब्बल तिघांच्या हत्येच्या घटनेनेनागपूर हादरले.
हत्येची पहिली घटना - इमामवाडा भागात दोन
मजुरांकडून मित्राची हत्या
नागपूरच्या इमामवाडा भागात
दोघांनी मिळून एकाची हत्या केली आहे. रामसिंग ठाकूर असे मृत इसमाचे नाव आहे.
किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे.
मृत रामसिंग ठाकूर, आरोपी राजू
बुरडे, मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून
इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक
कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या
डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह
विहिरीत फेकून दिला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.
दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली, यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
हत्येची दुसरी घटना - तिघांनी मिळून मित्राची
हत्या
ही पाचपावल पोलीस ठाण्याच्या
हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे (22) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडे बारा
वाजताच्या सुमारास तिघांनी चाकू आणि लोखंडी रॉडने रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये
रोशनचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वीरेंद्र उर्फ बाबू
बकरी, यशोदास उर्फ सॅनकी आणि अश्विन या
तिघांसोबत रोशनचा वाद सुरू होता. त्याच वादातून तिघांनी मिळून त्याची हत्या
केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
हत्येची तिसरी घटना - पोलिसांचा खबऱ्या
असल्याच्या संशयातून हत्या
ही घटना नागपूर जिल्ह्यातील
बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे
हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून
दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ
दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.