नुकतेच गृह विभागाने 23 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यातच राज्यातील सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असणाऱ्या 22 अधिकाऱ्यांना बढतीचा निर्णय गृह विभागाने घेतला. आज सायंकाळी गृह विभागाने बढतीबाबत आदेश काढले. प्रशांत परदेशी पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा, सागर कवडे, पोलीस अधीक्षक एटीएस मुंबई, पंकज शिरसाट, अश्विनी पाटील, रत्नाकर नवले, शीतल झगडे या चार अधिकाऱ्यांना राज्य गुप्तवार्ता विभाग येथे पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली आहे. प्रीतम यावलकर हे महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक असणार आहेत. जयंत बजबळे (पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर), पीयूष जगताप (पोलीस अधीक्षक यवतमाळ), बाबूराव महामुनी (पोलीस अधीक्षक बुलढाणा), अश्विनी पाटील (पोलीस उपायुक्त नागपूर), प्रीती टिपरे (पोलीस उपायुक्त, डायल 112, नवी मुंबई), समीर शेख (पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक कार्यालय), राहुल मदने (पोलीस उपायुक्त नागपूर शहर), रिना जनबंधू (अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर), अमोल गायकवाड (समादेशक, राज्य राखीव पोलीस बद, गोंदिया), कल्पना भराडे (प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर), ईश्वर कातकडे (अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा), दत्ता तोटेवाड, (अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती दल), याचे स्टाफ अधिकारी), नवनाथ ढकळे (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर) पदी बढती मिळाली आहे.