अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे.
अजय
देवगणच्या 'दृश्यम 2' या चित्रपटाला लोकांची खूप पसंती मिळते आहे. 'दृश्यम 2' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकल्यास, 'दृश्यम 2'चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. दुसऱ्या दिवशीही चित्रपटानं 21.59 कोटींची गल्ला जमावला. या चित्रपटाने
तिसऱ्या दिवशी 27.17
कोटींची कमाई केली. दुसरीकडे, चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरला
आणि त्याने 11.87
कोटी रुपयांची कमाई केली. 'दृश्यम 2' ने 5 व्या दिवशी 10.48 कोटी
रुपयांची कमाई केली.
सहाव्या
दिवशी म्हणजेच बुधवारीचं ही चित्रपटाचे कलेक्शनही समोर आले आहे. सुरुवातीच्या
आकडेवारीनुसार बुधवारी या चित्रपटाने 10 कोटींचा
व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ९६.४९ कोटींवर गेली आहे.
गुरुवारी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा
टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे.
अशी आहे कथा
विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची
हि कथा आहे. 4
ऑक्टोबर 2014 च्या रात्री घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात
रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून
थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक
रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची बॉडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे.
पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या
घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला
नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा
त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे घडतं ते पाहण्याजोगं आहे.