जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मित्राबरोबर मसाले भाताची पार्टी 18 वर्षीय तरूणांच्या जीवावर बेतली आहे. विहिरीतून पाणी आणताना तरूणाला विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला.
याबाबत
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यश चिकणे
हा लहान भाऊ आयुष चिकणे यांच्यासह संकेत चिकणे, सत्यम चिकणे, विशाल पवार, कुणाल चिकणे (सर्व रा. सोनगाव) हे रविवारी दुपारी मसाले भाताची
पार्टी करण्यासाठी आर्डे नावाच्या शिवारात गेले होते. याठिकाणी शिवारात उमेश काटकर
यांची विहीर आहे. मसाले भात करण्यासाठी या विहिरीतून यश पाणी आणण्यासाठी गेला.
विहिरीच्या
लोखंडी गजाच्या पायरीवर गेला असता, त्याला
विजेचा धक्का लागून तो पाण्यात पडला. यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याबाबतची
फिर्याद किरण तुकाराम चिकणे यांनी मेढा पोलिस ठाण्यात दिली असून त्याचा अधिक तपास
पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.