नवी दिल्ली : तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत
असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकार तुमचे रेशन कार्ड लवकरच रद्द करणार
आहे.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील लाखो लोकांची रेशन कार्ड रद्द केली जाणार
आहेत. म्हणजेच आता देशातील लाखो लोकांना मोफत
रेशनची सुविधा मिळणार नाही.
देशातील सुमारे 10 लाख लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊन फसवणूक करत असल्याची माहिती
सरकारने दिली आहे. या लोकांची यादीही विभागाने तयार केली आहे. आता या सर्व लोकांचे रेशन कार्ड
रद्द होणार आहेत.
या अंतर्गत सुमारे 10 लाख लोकांच्या रेशन कार्डवर चिन्हांकित करण्यात येणार आहे.
NFSA नुसार, जे लोक रेशन कार्डधारक आहेत आणि आयकर भरतात किंवा ज्यांच्याकडे जास्त जमीन
आहे. त्यांची नावे यादीतून काढून टाकली जातील. एवढेच नाही तर अशा लोकांना मोफत रेशनही
मिळणार आहे. असे अनेक रेशन कार्डधारक आहेत, जे मोफत रेशन घेऊन व्यवसाय करतात, त्यांचे रेशन
कार्ड देखील रद्द केले जाईल.
दरम्यान, सरकारच्या नियमानुसार, अपात्र लोकांची संपूर्ण यादी डीलरला पाठवली जाईल, जेणेकरून
चुकूनही डीलर या लोकांना रेशन देणार नाही. एवढेच नाही तर, डीलर्स अशा लोकांच्या रेशन कार्डवर
चिन्हांकित करून त्यांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर या लोकांचे रेशन कार्ड रद्द
केले जाईल.
विशेष म्हणजे, देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळत आहे. अशा
परिस्थितीत काही लोक या योजनेचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत. मात्र सरकार आता या
लोकांवर
कारवाई करण्याचा तयारीत आहे. अशा लोकांची फक्त रेशन कार्ड रद्द होणार नाहीत, तर त्यांच्याकडून
वसुलीही केली जाईल.