पुणे, दि. 20 -पुणे -बंगळुरू 'ग्रीन कॅरिडोअर'ची प्राथमिक आखणी पूर्ण झाली आहे.
त्यानुसार पुणे-बंगळुरू अंतर 100 किलोमीटरने कमी होणार आहे. तर प्रवासाच्या वेळेत सुमारे दोन
तासांची बचत होणार आहे.
पुणे-बंगळुरू
हे अंतर सुमारे 850 किलोमीटर आहे. नव्याने तयार करण्यात
येणाऱ्या ग्रीन कॅरिडोअरमुळे हे अंतर शंभर किलोमीटरने कमी होऊन 750 किलोमीटर होणार आहे. सध्या प्रवासासाठी दहा ते बारा तास
लागतात. नव्या मार्गामुळे वेळेतही बचत होणार असून आठ ते नऊ तासांमध्ये बंगळुरूला
जाणे शक्य होणार आहे.
हा ग्रीन कॅरिडोअर शंभर मीटर
रुंदीचा आणि सहा पदरी असणार आहे. ताशी 80 ते 100 किलोमीटरचा वेग असणार आहे. दोन ते तीन महिन्यांत डीपीआरचे काम
पूर्ण करण्याचे बंधन सल्लागार कंपनीला घालण्यात आले आहे.
सर्वेक्षणाचे काम सुरू
सध्या अस्तित्वात असलेल्या
पुणे-बंगळुरू मार्गापेक्षा हा मार्ग पूर्णत: वेगळा असणार आहे. प्राथमिक मार्गाची
आखणी पूर्ण झाली असून, सध्या
प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि महिती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.