मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन
मराठीतील लोकप्रिय अँकर्सला ऐकण्याची अनोखी संधी
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात मराठीतील लोकप्रिय अँकर्सना भेटण्याची, ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.. राज्यातील पत्रकारांसाठी ही पर्वणी आहे..
मिलिंद भागवत (न्यूज १८लोकमत), विलास बडे (न्यूज १८ लोकमत) अश्विन बापट ( एबीपी माझा) रेश्मा साळुंखे (झी २४ तास) निकिता पाटील (टीव्ही 9)अनुपमा खानविलकर (झी २४ तास) हे अँकर्स बातमी सादरीकरणातील गंमती - जमती, पत्रकारितेतील अनुभव, पत्रकारितेतील प्रवास यावर विवेचन करणार आहेत.. सर्व लोकप्रिय अँकर्स मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येऊन राज्यातील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याने ही अधिवेशनास येणारया पत्रकारांसाठी पर्वणी ठरणार आहे..
"मी अँकर" हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे.. पिंपरी चिंचवड येथील शंकरराव गावडे कामगार भवनात होणारया या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, अरूण नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, अनिल बडघुले यांनी केलं आहे..