सासवड येथील बेकायदेशीर डुक्कर पालना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
कर्कश्श आवाज, दुर्गंधी व घाणीमुळे नागरिक त्रस्त
सासवड ( ता पुरंदर ) येथील वीर बाजी पासलकर शाळेच्या शेजारील लोकवस्तीमध्ये बेकायदेशीर डुक्कर पालन करण्यात आले आहे. याबाबत सर्व कैकाडी समाजाच्या वतीने सासवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आले
लोकवस्तीत केलेल्या डुक्कर पालनामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दिवसा व रात्री कर्कश्श आवाजामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परीसरात दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे.
आत्तापर्यंत अनेक विनंती अर्ज सासवड नगरपालिकांना देण्यात आले आहेत परंतु आजतागायत कसलीही कारवाई करण्यात आली नाही यासाठी समस्त कैकाडी समाज यांच्यावतीने पुन्हा एकदा बेकायदेशीर डुक्कर पालन बंद व्हावे म्हणून सासवड नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे.
या लोकवस्तीतील बेकायदेशीर डुक्कर पालन बंद करण्यात यावे यासाठी अनेक वेळा सासवड नगरपरिषदला संपर्क साधला, निवेदन देण्यात आले परंतु कसलीही दखल घेण्यात आली नाही असे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल माने यांनी यावेळी सांगितले