अखेर जिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, तिला आदित्यनं सर्वांसमोर आणलंच
सेलिब्रिटी मंडळी सहसा त्यांच्या खासगी आयुष्याला गुलदस्त्यातच ठेवतात. कोणत्याही नात्यामध्ये अमुक एका वळणावर आल्यानंतरच ते नात्याची ग्वाही देतात.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या घरी दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी या जोडीनं हजेरी लावली आणि त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. मुख्य म्हणजे या पार्टीआधीपासूनच त्यांच्या नात्याची चर्चा झाली. इतकंच काय, तर एकमेकांच्या नावांवरून त्यांना छेडलंही गेलं. आता अखेर हे सेलिब्रिटी कपल पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आलं.
हे Couple म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे काहींच्या मते त्यांचा चित्रपट येत असावा म्हणून ही स्टंटबाजी. पण, प्रत्यक्षात तसं नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य आणि अनन्याच्या लग्नाच्याही चर्चा सुरु आहेत.