जेऊर येथे युवकांनी दिले हरणाला जीवदान
नीरा दि.२८
पुरंदर तालुक्यातील जेऊर येथे युवकांनी व छोट्या मुलांनी एका हरणाला जीवदान दिले आहे. कुत्र्याच्या तावडीतून हरणाची सुटका करण्यात या मुलांना यश आले आहे.या हरणाला आता वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
आज शुक्रवार दिनांक 28 रोजी जेऊर येथील प्रज्वल प्रकाश जाधव श्रावणी विजय जाधव, श्रावण विजय जाधव,
व विजय जाधव हे शेतात काम करीत होते.यावेळी जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या हरणाचा आवाज त्यांना आला .त्यांनी आवाजाच्या दिशेने पहिले असता दोन कुत्री त्या हरणाला मारत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले.यानंतर त्यांनी वनविभागाला फोन करून याबाबतची माहिती दिली आहे या हरणाला ते वनविभागाच्या ताब्यात देणार आहेत.या युवकांनी दाखवलेल्या धाडस बद्दल त्यांचं ग्रामस्थांनी कौतुक केलय...