मॉस्कोतील रस्त्यांवरून पुरुष झाले गायब
युक्रेनला युद्धासाठी पाठवण्याची अनेकांना भीती
मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेले कित्येक महिने सुरू असलेल्या युद्धाचे इतर सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत.
मॉस्को शहराची लोकसंख्या एक कोटी वीस लाख एवढी प्रचंड आहे पण सध्या मात्र मॉस्कोतील रस्ते निर्जन दिसत आहेत. शहरातील हॉटेल्समध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये कोणत्या प्रकारची गर्दी नाही दुकानांमध्ये सुद्धा तुरळकच गर्दी दिसत आहे, त्यामध्ये महिलांची गर्दी जास्त आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात जबरदस्तीने सहभागी करून घेण्याची शक्यता असल्याने अनेक पुरूषांनी देशही सोडला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल दोन लाख पुरुषांनी मास्को सोडून कजाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.
शेजारी असलेला कजाकिस्तानमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसा या प्रक्रियेची गरज नसल्याने अनेकांनी तो मार्ग स्वीकारला आहे. अनेक रशियन पुरुष जॉर्जिया अर्मेनिया अझरबैजान आणि इतर पश्चिम युरोपीय देशांमध्ये रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुरुषांचे हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारण रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांनी जर देशात मार्शल लॉची घोषणा केली तर सर्व सीमा सील केल्या जातील व त्यानंतर कोणालाही देश सोडून जातात येणार नाही. याची कल्पना असल्याने आत्तापासूनच अनेकांनी रशिया सोडून जाण्यास प्रारंभ केला आहे.
मॉस्को शहरात अनेक दैनिकसाठी छायाचित्रकार म्हणून काम करणारी 33 वर्षीय स्वतीलना हिने दिलेल्या माहितीप्रमाणे राजधानी मॉस्को नव्हे तर राज्यातील अनेक शहरे जणू काही फक्त महिलांची शहरे बनली आहेत. रेल्वे असोत बसेस असोत किंवा मॉल असोत सर्वत्र फक्त महिलाच दिसत असून पुरुषांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.