नीरा मोरगाव मार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकजण जखमी : खडीवरू घसरली मोटरसायकल
नीरा दि.२
पुरंदर बारामतीच्या सीमेवरून जाणाऱ्या नीरा मोरगाव मार्गावर नीरा-गुळुंचे दरम्यान जगताप वस्ती येथे रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारीक खाडीचा वापर केलाय. यावरून वाहने घसरन्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आज रविवारी गुळुंचे येथील मधुकर शंकर कांबळे वय वर्षे ६० हे नीरा येथून गुळुंचे येथे जात होते.ते त्यांच्या एमएच १२ सीझेड ४५३ या दुचाकीवरून घरी जाताना जगतापवस्ती येथे रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरल्याने हा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना नीरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच दिवसात दोन चारचाकी कार पलटी होऊन तीन जण जखमी झाले होते.त्यानंतर अजूनही या रस्त्यावर खडी असल्याने असे अपघात होत आहेत.