कडेपठार व पिंगोरी परिसरात झालेल्या पावसामुळे पिसुर्टी येथील पुल गेला पाण्याखाली
नीरा दि.१२
पुरंदर तालुक्यातील कडेपठार डोंगरावर पिंगोरी आणि दौंडज या गावांच्या क्षेत्रात आज पहाटे जोरदार पाऊस झालाय.त्यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे जेऊर आणि पिसुर्टी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय.त्यामुळे पिसुर्टी गावाचा संपर्क तुटला असून हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी व शालेय मुलांना अडचण निर्माण झाली आहे.पिसुर्टी येथील अनेक मुले माध्यमिक शिक्षणासाठी जेऊर येथील शाळेत जातात त्यांना या पुरा मुळे शाळेत जात आले नाही त्यातच आता शाळेत परीक्षा सुरू आहेत.
तालुक्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय.त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे.आज पहाटे झालेल्या या पावसामुळे पिंगोरी, दौंडज, वाल्हे,या भागातील.शेतीला देखील फटका बसला आहे. दरम्यान या पुलाची उंची वाढवण्याची मागणी पिसुर्टीकर ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान तालुक्यात पावसाचा जोर आज दिवसभर आजूनही तसाच आहे.