पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट पुन्हा ४८ तास राहणार बंद,
दसऱ्या निमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.
नीरा : १
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर नीरा ते जेजुरी दरम्यान पिसुर्टी येथे असणारे रेल्वे गेट दि. ०३ ते दि.०५ या काळात वाहतुकीसाठी ४८ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दि.०२ ते दि.०५ हा काळ नवरात्रीतील शेवटचे तीन दिवस व दसरा हा महत्त्वाचा सण असुन त्या आधी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवल्याने सातारा जिल्ह्यातील व स्थानीकांनी या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर पिसुर्टी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी सोमवार दि. ०३ आक्टोंबर सकाळी ७ वाजल्यापासून ते बुधवार दि. ०५ आक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव - जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
चौकट १)
पुढील आठवडा हा नवरात्रीतील महत्त्वाचे शेवटचे दोन दिवस आहेत, तर बुधवार दि. ०५ रोजी दसरा हा महत्त्वाचा सण आहे. या तीन चार दिवसांत प्रवाशी मोठ्या संख्येने ये जा करतात. या मार्गावरून पुढील या तीन दिवसांत पुणे, मुंबई, नाशिक व राज्यभरातून चाकरमानी आपल्या मुळगावी दसरा सण साजला करण्यासाठी जात असयात. मात्र जेजुरी ते नीरा दरम्यानचा पालखी मार्ग रेल्वेने बंद ठेवल्याने या प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे युऊन पुढिल प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा या मार्गावरील प्रवाशांना पडणार आहे.
************************************
या सहा महिन्यात पिसुर्टी रेल्वेगेटचे काम तब्बल पाच वेळा केल्याने पालखी महामार्ग बंद ठेवावा लागला आहे. आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस, तसेच गणेशोत्सवाच्या आधी दोन दिवस व आता दसरा सणा आधी दोन दिवस हा पालखी मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवल्याने फक्त सणासुदीच्या मुहूर्तावरच अशी कामे करण्याचा मानस रेल्वे विभागाने केल्याची चर्चा आहे.
************************************
"गेली सहा महिन्यात पिसुर्टी रेल्वे गेट पाच वेळा बंद केले आहे. पुणे पंढरपूर पालखी महामार्ग हा रस्ता नँशनल हायवेकडे वर्ग झालेले सात वर्षांहून अधी काळ झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता नीरा शहराला बायपास रस्ता पिसुर्टी, जेऊर या गावांच्या हद्दीतील शेतातून गेला आहे. मात्र आताच्या मार्गावरुनच संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गेटच्या जागी उड्डाणपूल करावा अशी मागणी आम्ही खा.सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पुणे रेल्वे विभागाकडे करणार आहोत."
कांचन निगडे
प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी