यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही : रामदास तांबे.
नीरा १
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे. तसेच यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रम व संघर्षाला पर्याय नाही असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिसारण विभागाचे सहाय्यक अभियंता रामदास तांबे यांनी केले.
पुरंदर ऑफिसर्स चारिटेबल फाउंडेशन पुणे. यांच्या वर्धापन दिनानिमित जेऊर येथील आचार्य अत्रे
विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल जेऊर या विद्यालयातील आयोजित केलेल्या व्यक्तिमत्व विकास -मी कसा घडलो? या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनंत तांबे सरपंच
शोभा तांबे, उपसरपंच तेजस जाधव, माऊली धुमाळ, पोलीस पाटील कुंडलिक तांबे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धुमाळ, नारायण तांबे, प्रतीक धुमाळ, संभाजी ठोंबरे, पोपट जाधव मेघनाथ तांबे, घनश्याम तांबे, सेवानिवृत शिक्षक चोरगे गुरुजी, मोतीराम तांबे, विठ्ठल चोरमले, सोमनाथ तांबे, संतोष किरवे, जनार्दन तांबे, महादेव बरकडे, भगवान तांबे, नानासो बरकडे, विठ्ठल बरकडे, दादा खोमणे, दीपक तांबे, तानाजी तांबे विद्यालयाचे मुख्याध्यापक जालिंदर जगताप सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी कसा घडलो? या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पर्यंतचा शालेय जीवनाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्याच्या अंगी आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा नम्रता अत्यंत आवश्यक आहे. केवळ परीक्षे पुरता अभ्यास न करता आजूबाजूला वर्तमान काळात ज्या ज्या घटना घडत आहेत याकडे बारकाईने लक्ष देऊन आपलं सामान्यज्ञान वाढवावे, यासाठी कोणतेही वर्तमानपत्र दररोज वाचणे आवश्यक आहे. इंग्रजी विषयाचा बाऊ न करता त्याचा चांगला सराव केल्यास तुम्हाला तो सोपा जाईल. तसेच मोबाईलचा वापर विशिष्ट मर्यादेपर्यंत केल्यास तो उपयुक्त ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामधील भारतीय नागरिकांच्या सर्व जबाबदाऱ्या अंगी बाणवून भारताचा सुज्ञ नागरिक बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. परमेश्वराने आपल्याला शरीर दिले आहे ते सदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, शिस्तबद्धपणा, अंगी बाणवणे आवश्यक आहे. असे तांबे यांनी सांगितले,
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व शाळा समितीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक चौरंगनाथ कामये यांनी केले व आभार माधव गाडेकर यांनी मानले.