नीरा जवळच आढळले लंपी बाधित जनावर :नीरा आणि परिसरात लंपी प्रतिबंधक लसीकरण सुरू
नीरा दि.२१
पुरंदर तालुक्यातील नीरा आणि परिसरात आज बुधवार पासून लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यास सुरवांत करण्यात आली आहे. नीरा पासून जवळच असलेल्या बारामती तालुक्यातील फरांदे नगर मध्ये लंपिचा एक रुग्ण आढळून आलंय... त्यामुळे त्यापासून पाच किलोमीटर परिघात असलेल्या गावातून आता लंपी प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येत आहेत
आज बुधवारी सकाळी पशुवैद्यकिय विभागाची टीम नीरा येथे दाखल झाली यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भंडलकर यांच्या नेतृत्वाखाली . डॉ.के टी.लाड, डॉ. भुषण लोखंडे,डॉ गणेश मोरे,डॉ. किरण खळदकर यांची टीम लसीकरण करीत आहे.नीरा आणि परिसरासाठी आज ५०० लस उपलब्ध झाली असून आज दिवस भरात ५०० जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे त्याच बरोबर आणखी 12 हजार लस उपलब्ध झाली असून जवळच्या इतर गावातील जनावरांचे सुध्धा लसीकरण केण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संभाजी भंडलाकर यांनी दिली आहे. लोकांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
तर नीरा येथील सरपंच तेजश्री काकडे व माजी उपसरपंच सुदाम बंडगर यांनी लोकांना आपल्या जनावरांचे लासिकर करून घेण्याचे आवाहन केले आहे.