फटाके फोडून, पेढे वाटून वाल्हे येथे शिवसैनिकांचा जल्लोष.
वाल्हे (दि. २५) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर उच्च न्यायालयाने मूळ शिवसेनेला परवानगी दिल्यानंतर, वाल्हे (ता. पुरंदर) येथील शिवसैनिकांनी फटाके फोडून पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यामध्ये शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामधील रस्सीखेच न्यायालयापर्यंत पोचली होती.
त्यामुळे शिवाजी पार्कच्या मैदानावर दसरा मेळावा कोण घेणार याविषयी प्रचंड राजकीय उत्सुकता होती. उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी आज परवानगी दिल्याने वाल्हे येथील शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी बोलताना माजी सभापती गिरीश पवार म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयातील लढाई अजून राहिली असून तीही आम्ही जिंकू. पण, उच्च न्यायालयाचा निकाल हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयाची नांदी असून यावर्षीचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्य असा होईल".
या वेळी माजी सभापती गिरीश पवार व जेष्ठ शिवसैनिक सुरेश पवार यांच्या हस्ते बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी, मोतीराम गावडे, सचिन पवार, दत्तात्रेय राऊत, भाऊसाहेब पवार, नवनाथ पवार, हरीश दुबळे, शिरीष पवार, गणेश पवार, रवींद्र लंबाते, सचिन जाधव, शिवाजी माने, सुजित रणनवरे, समीर पवार, शिवाजी माने आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.