नीरा येथील बुवासाहेब ओढयावरील पुल गेला वाहून
नगर सातारा व नीरा - बारामती मार्ग झाला बंद
नीरा दि.७
नीरा (ता.पुरंदर) येथे बुवासाहेब ओढ्याला आलेल्या पुरामुळे या ओढ्यावरील तात्पुरता पूल वाहून गेला आहे. यामुळे निरेहुन मोरगाव कडे जाणारा सातारा - नगर हायवे तसेच निरा - बारामती रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे या भागातील लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.
पुरंदर तालुक्यातील निरा जवळ बुवासाहेब ओढ्यावर गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम चालू आहे. जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन उंच पुल बांधण्यात येतो आहे. मात्र गेली अनेक दिवस या पुलाचे काम ठेकेदाराने बंद ठेवले आहे या ठेकेदाराने वाहतुकीसाठी तात्पुरता कच्चा फुल बांधला होता. पावसामुळे हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याचे माध्यमांनी अनेक वेळा दाखवून दिलं होतं. मात्र तरी देखील प्रशासन व स्थानिक नेते मंडळी यांनी याकडे दुर्लक्ष केलं. काल रात्री गुळूंचे राख कर्नलवाडी नावळी या भागामध्ये प्रचंड असा पाऊस झाला. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी बुवासाहेब ओढ्यात आले. त्यामुळे रात्री हा फुल मोठ्या प्रमाणात वाहून गेला.
आता या वाहून गेलेला पुलामुळे नगर - सातारा आणि बारामती - निरा हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व बांधकाम विभागातील केलेल्या दुर्लकक्षा मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया निरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल साबळे यांनी दिली आहे.