पिसे सोसायटी च्या चेअरमन पदी हनुमंत मुळीक बिनविरोध :
सासवड:प्रतिनिधी दि.१०
पिसे (ता.पुरंदर )येथील म्हस्कोबा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हनुमंत गोविंद मुळीक व व्हाईस चेअरमनपदी अलका रावसो मुळीक यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बागवान मॅडम यांनी जाहीर केले.
यावेळी संस्थेचे सचिव सोमनाथ चव्हाण उपस्थित होते या निवडणुकीत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलने श्रीनाथ म्हस्कोबा सहकार पॅनलचा पराभव करून १३ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या परंतु तीन अपत्य असल्यामुळे भानुदास बाळकृष्ण मुळीक याना चेअरमनपद गमवावे लागले.त्यामुळे ती जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले.श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलमधून अलका रावसो मुळीक,गोपीनाथ बाबुराव मुळीक,नवनाथ बापूराव मुळीक,बाळासो काशिनाथ सांगळे,रमलविठ्ठल मुळीक ,हनुमंत गोविंद मुळीक ,मोहन धोंडिबा मुळीक,पोपट नाथू मुळीक,रोहिदास सोपाना मुळीक,लहानू पर्वती मुळीक बिनविरोध निवड झालेले २ उमेद्वार निवृत्ती दत्तू चव्हाण, लक्ष्मण सुदाम जगताप झे उमेद्वार शिवसेनेचे विजयी झाले होते.
शिवसेनेच्या वतीने विजयी उमेदवारांचा सासवड येथे सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना नेते रमेश इंगळे व हरिभाऊ लोळे रामदास (बापू)मुळीक ,माजी सरपंच गणेश मुळीक.माजी उपसरपंच सोमनाथ मुळीक,सोसायटी चे चेअरमन आप्पा मुळीक ,प्रकाश आनंदराव मुळीक,माजी उपसरपंच संदीप मुळीक,शांताराम रघुनाथ रघुनाथ मुळीक ,भुजंग गुलाब मुळीक ,पोपट गुळंब,प्रेमचंद कुटे,लता बाळासो मुळीक,ईश्वर मुळीक ,आदेश मुळीक ,अक्षय मुळीक ,पत्रकार हनुमंत वाबळे ,पत्रकार बापू मुळीक ,संतोष ठोंबरे आदी उपस्थित होते.
तर शिवसेनेची एकजूट विचार विनिमय सध्या करूनच हि निवडणूक चांगल्या मताने शिवसेनेने एक हाती विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा फडकावला असल्याचे व्हाईस चेअरमन अलका मुळीक यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.